Breaking News | Pune Crime: संचालकाला विद्यार्थीनीवर अत्याचाराप्रकरणी (abuse) अटक.
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील क्रिएटिव्ह अॅकॅडमीच्या संचालकाला विद्यार्थीनीवर अत्याचाराप्रकरणी अटक कऱण्यात आली आहे. क्रिएटिव्ह अॅकॅडमीचे संचालक नौशाद अहमद शेख याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील रावेत कॉर्नर येथे नौशाद अहमद शेख क्रिएटिव्ह अॅकेडमी ही निवासी शाळा चालवतो. 2021 मध्ये पीडित मुलीच्या वडिलांनी तिला नववीमध्ये निवासी शाळेत प्रवेश घेऊन दिला होता. त्यासाठी पीडितेच्या वडिलांनी दोन लाख 26 हजार रुपये मोजले होते. मुलींच्या हॉस्टेलच्या पहिल्याच मजल्यावर नौशाद शेख राहायचा. पीडित मुलगी 14 वर्षांची असताना शेख याने मुलीवर अत्याचार केले. 2022 मध्ये फ्लॅटवर बोलवून पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने शेख याला प्रतिकार केला. त्यावेळी त्याने पीडितेला धमकी दिली.
तुझे येथील मुलांसोबत संबंध असल्याचे तुझ्या घरच्यांना सांगेन, अशी धमकी शेख याने त्या अल्पवयीन मुलीला दिली. त्याने धमकावून वारंवार मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दिवाळीच्या सुट्टीतही अत्याचाराचा प्रयत्न केला. अकॅडमीतील 12 वीच्या मुलीच्या समोरही अश्लील शेरेबाजी केली. याच अॅकेडमीतीली एका माजी विद्यार्थीनीनेही पीडितेला शेख याच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचे तक्रारीत म्हटलेय. नोव्हेंबर 2022 मध्ये शेख याने पीडितेला फ्लॅटवर बोलवून अत्याचार केला. त्याशिवाय मोबाईलमध्ये अनेक मुलीसोबतचे त्याचे अश्लिल फोटोही दाखलवले. पीडितेवर अत्याचार केला. दोन वर्ष शेख मुलीसोबत अत्याचार करत होता. घाबरलेली मुलगी निवासी शाळेत राहण्यास तयार नव्हती. आई वडिलांनी तिला गावाकडे नेले, 11 जानेवारी 2024 रोजी मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रसंग कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत शेख याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Abuse of minor girl by director
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study