Home पुणे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जबरदस्तीने गर्भपात

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जबरदस्तीने गर्भपात

Breaking News | Pune Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. यातून पिडीत मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याची घटना.

Abuse of minor girl, forced abortion

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. यातून पिडीत मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी परराज्यातील 22 वर्षाच्या तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत वाघोली येथे घडला आहे.

याप्रकरणी 15 वर्षाच्या पिडीत मुलीने शुक्रवारी (दि.14) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अमित कुमार गोस्वामी (वय-22 रा. पुसोल जि. कैमुर, बिहार) याच्यावर आयपीसी 376/2/ए, 323, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत ओळख करुन तिच्यासोबत मैत्री केली. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आरोपी अमित गोस्वामी याने पिडीत मुलीच्या राहत्या घरी जाऊन ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून पिडीत मुलगी गरोदर राहिली. तिने याबाबत अमित याला सांगितले. त्याने मुलीला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास देऊन तिचा गर्भपात केला. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर तुझी बदनामी करेन अशी धमकी देऊ मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोनाली भदे करीत आहेत.

Web Title: Abuse of minor girl, forced abortion

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here