Home क्राईम संगमनेर खुर्दच्या उपसरपंचाकडून महिला तलाठ्यास अश्लील शिवीगाळ

संगमनेर खुर्दच्या उपसरपंचाकडून महिला तलाठ्यास अश्लील शिवीगाळ

abuse of women talattas by sub-panch of Sangamner Khurd

संगमनेर | Sangamner: संगमनेर खुर्द येथे काल दुपारी महिला ग्रामसेवकाची गाडी अडवून या तलाठ्याकडील कागदपत्रांची पिशवी फेकून देत अश्लील शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे.

फिर्यादी महिला संगमनेर खुर्द येथे तलाठी पदावर कार्यरत आहे. त्या काल कार्यालयातील काम आटोपून आपल्या  अ‍ॅक्टिवा क्रमांक एम. एच. 17 बी. एच. 2978 या दुचाकीवरून दुपारी तीन वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाकडे वाळू संदर्भात अहवाल कार्यालयात देण्यासाठी जात होत्या. संगमनेर खुर्द येथील मंदिराजवळ आले असता समोर उभा असलेला उप सरपंच गणेश साहेबराव शिंदे याने या तलाठी महिलेस आवाज देऊन थांबविले आणि माझ्या वारसानोंदी चे काम का होत नाही असे त्याने विचारले त्यावर माझ्याकडून एक काम झाले असून मंडलाधिकारी यांच्याकडे कागदपत्रे पाठविली आहे. ठराव मंजूर झाल्यानंतर फेरफार देते असे सांगितले. आपली दुचाकी चालू करून त्या निघाल्या असता उपसरपंचांनी त्यांचा गाडीची चावी काढली. कागदपत्रे फेकून दिली. तुम्ही फार इगोमध्ये आहात. तोंडाचा मास्क काढा. तुमचा फोटो काढतो असे म्हणून गणेश शिंदे याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच अश्लील शिवीगाळ करत असभ्य वर्तन केले. याबाबत पिडीत महिला तलाठ्याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांनी उपसरपंच गणेश साहेबराव शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: abuse of women talattas by sub-panch of Sangamner Khurd

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here