Home पुणे मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत अत्याचार

मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत अत्याचार

Breaking News | Pune Crime: अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Abuse taking advantage of the girl's ignorance

पुणे : अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवले तिला घरी बोलवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध  ठेवले. यातून पिडीत मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार एप्रिल ते मे 2024 या कालावधीत आरोपीच्या राहत्या घरी घडला आहे.

याबाबत पिडीत 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या आईने बुधवारी (दि.10) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवराज महेश गायकवाड (वय-19 रा. गुजरवाडी, कात्रज) याच्यावर आयपीसी 376/2/द, पोक्सो कलम 3, 4, 8 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, , आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीसोबत ओळख केली. त्यानंतर ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन लग्नाचे आमिष दाखवले. तिला भेटण्यासाठी घरी बोलवून घेत तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून पिडीत मुलगी सात आठवड्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Abuse taking advantage of the girl’s ignorance

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here