धक्कादायक! तीन वर्षापासून पोटच्या मुलीवर बापाकडून अत्याचार, भावाने आणले उघडकीस
Breaking News | Hingoli Crime: नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार (abused) करणाऱ्या नराधम बापावर गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापावर गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुलीच्या भावामुळे घटना उघडकीला आली असून पोलिसांनी मुलीच्या बापास बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील अल्पवयीन मुलीचे आई, आजी, आजोबा व भाऊ मंगळवारी दुपारी शेतात कामासाठी गेले होते. दुपारी मुलगी शाळेतून आल्यानंतर घरी झोपली होती. यावेळी त्या मुलीचे वडिल घरी आले. त्याने मुलगी घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेत तिला बळजबरीने ओढून दुसऱ्या खोलीमध्ये नेले तसेच तिला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, याचवेळी तिचा भाऊ शेतातून घरी आल्यामुळे मुलगी रडतच भावाजवळ गेली. त्यानंतर तिच्या भावाने 112 क्रमांकावर संपर्क केला. माझ्या वडिलांनीच बहिणीवर अत्याचार केला असून तो पळून जात असल्याचा संदेश त्याने दिला.
या प्रकाराची माहिती मिळताच गोरेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक शामकुमार डोंगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक नितेश लेनगुळे, जमादार राहूल मैंदकर, सोपान रणखांबे, विठ्ठल खोकले, अनिल भारती यांच्या पथकाने तातडीने गावात जाऊन पाहणी केली. यावेळी त्या मुलीला व तिच्या आईला विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी रात्रीच हराळ शिवारात जाऊन एका शेतातून नराधम बापाला ताब्यात घेतले. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून तिच्या बापा विरुध्द गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन माहिती विचारली असता, मागील तीन वर्षांपासून बापाने माझ्यावर वेळोवेळी अत्याचार केला आहे. सदर घटना कोणाला सांगितली तर तुला व आईला मारून टाकतो, अशी धमकी दिली. त्यामुळे मुलीच्या मनात भीती कायम होती. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Abused by the father on the girl from the age of three
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study