Home महाराष्ट्र इन्स्टाग्रामवर गुलुगुलुः नंतर तरुणाला भेटणे महागात पडले

इन्स्टाग्रामवर गुलुगुलुः नंतर तरुणाला भेटणे महागात पडले

Crime News: अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार.

abused Instagram Later meeting the young man became expensive

मुंबई: इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या तरुणाला भेटणे अल्पवयीन मुलीला भलतेच महागात पडले आहे. या तरुणाने १७ ऑक्टोबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास तिला आपल्या घरी भेटायला बोलावले. येथे आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याला विरोध केला. मात्र आरोपीने तिला कंबरपट्ट्याने मारहाण करत तिच्यासोबत असलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केला आहे.

याप्रकरणी माहीम पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. पीडित मुलगी दादरमध्ये कुटुंबासोबत राहते. यातील १९ वर्षीय आरोपीसोबत तिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाल्यानंतर आरोपीने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

Web Title: abused Instagram Later meeting the young man became expensive

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here