Home अहमदनगर अहमदनगर: अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

अहमदनगर: अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

Breaking News | Ahmednagar: अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर वारंवार अत्याचार (abused) केल्याचा प्रकार समोर.

abused to spread obscene photos virally

अहमदनगर: अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेने घडलेला प्रकार अत्याचार करणाऱ्या तरुणाच्या वडिलाला सांगितला असता त्याने देखील पीडितेसोबत गैरवर्तन केले. याप्रकरणी पुणे येथे राहणाऱ्या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश रावसाहेब धरम, त्याचे वडिल रावसाहेब माधव धरम (दोघे मोहिनीनगर, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी विवाहिता कुटुंबासह पुणे येथे राहतात. त्यांच्यावर ३० नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे अडीच वाजता गणेश धरम याने त्यांच्या राहत्या घरी अत्याचार केला. त्यानंतर त्याने त्याची बहिण प्रियंका वीर (एमआयडीसी, नगर) हिच्या घरी, पुण्यातील फिर्यादीच्या घरी व पुण्यातीलच दोन लॉजवर ४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वेळोवेळी अत्याचार केला. गणेश याने फिर्यादीसोबत काढलेले अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, घरच्यांना व फिर्यादीला कायमचे संपवून टाकण्याचा दम देऊन अत्याचार केला. तसेच फिर्यादीकडील सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले.

तसेच घडलेला प्रकार फिर्यादीने गणेशचे वडिल रावसाहेब याला सांगितला असता त्याने देखील फिर्यादीसोबत गैरवर्तन करून, ‘माझ्या मुलाचे नाव मला सांगते, माझेही नाव सगळ्यांना सांग’, असे म्हणून गैरवर्तन केले. ‘हिला बिनधास्त वापर, कोण काय करतो बघून घेऊ, तुझा बाप आहे ना, काय कोणाला घाबरतो, काय होईल ते पाहून घेतो, घाबरू नको’, असे गणेश याला म्हणून झाल्या प्रकाराबाबत रागवण्या ऐवजी किंवा समजावून सांगण्याऐवजी प्रोत्साहन दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान पीडितेने याप्रकरणी सोमवारी (दि. ५) कोतवाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी गणेश धरम व त्याचे वडिल रावसाहेब धरम विरोधात अत्याचार, खंडणी, विनयभंग, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एम. जानकर करत आहेत.

Web Title: abused to spread obscene photos virally

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here