Home Accident News नगर-कल्याण महामार्गावर पीकअप व छोटा हत्ती यांच्यात भीषण अपघात, दोन ठार

नगर-कल्याण महामार्गावर पीकअप व छोटा हत्ती यांच्यात भीषण अपघात, दोन ठार

accident between pickup and small elephant on Nagar-Kalyan highway

ओतूर:  नगर-कल्याण महामार्गावर वाटखळे गावाच्या हद्दीत वळणावर सामोरासमोर पीकअप् जीप व छोटा हत्ती या वाहनांत अपघात (accident)   झाला. या अपघातात एक प्रवासी व छोटा हत्तीचा चालक या दोघांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात शनिवारी (दि. १२) सकाळी ७. ४५ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबतची माहिती  ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  महिंद्रा पीकअप जीप (एमएच १४ ईएम २३८४) व छोटा हत्ती (एमएच १४ जेएल ५७६९) यांची नगर-कल्याण महामार्गावर वाटखळे (ता.जुन्नर) गावच्या नजिक असणाऱ्या वळणावर समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात (accident) झाला. यामध्ये छोटा हत्ती गाडीतील प्रवासी संदीप जयसिंग सुपेकर (वय ४१, रा. नांदूर खंदर माळ, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) हे जागीच ठार झाले. तर चालक अमर चंद्रकांत रोडे (वय २६, रा. धामणी, ता. आंबेगाव) हे गंभीर जखमी(injured) झाल्याने त्यांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात नेले असता उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू (death) झाला.

ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन डोळस हे अधिक तपास करीत आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Web Title: accident between pickup and small elephant on Nagar-Kalyan highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here