Home अहमदनगर Accident: पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू

Accident: पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू

Nevasa Accident News: ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मोहन भगत यांचे चिरंजीव शरद ऊर्फ राजेंद्र मोहनराव भगत (वय 46) यांचा अपघातात मृत्यू.

accident between pickup and two-wheeler, youth dies

नेवासा: नेवासा तालुक्यातील चांदा घोडेगाव रोडवर पंचवटीजवळ मोटारसायकल व पिकअपचा भीषण अपघात झाला, या अपघातात चांदा येथील तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी हा अपघात घडली.

चांदा येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मोहन भगत यांचे चिरंजीव शरद ऊर्फ राजेंद्र मोहनराव भगत (वय 46) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी चार वाजेदरम्यान पिकअप गाडी चांदा रोडने घोडेगावकडे कांदा गोणी घेऊन जात असताना पंचवटीजवळ समोरून दुचाकीवर येणार्‍या राजेंद्र मोहनराव भगत यांची समोरासमोर धडक झाली. त्यात राजेंद्र भगत गंभीर जखमी  झाले. त्यांना तातडीने नगर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

अपघात इतका भीषण होता की त्याच्या प्रचंड आवाजाने आजबाजूच्या परीसरात घबराट पसरली होती. परिसरातील युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. घटनास्थळापासून राजेंद्र भगत यांची वस्तीही याच रोडवर अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे.

अपघातात गावातील तरुणाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ् व्यक्त केली जात आहे . दरम्यान सोनई पोलीस ठाण्याला घटनेची खबर मिळताच घटनास्थळी दाखल झाले. याबाबत 54/2022 क्रमांकाने अकस्मात मृत्यू रजिस्टरला नोंद केली असून अधिक तपास हवालदार मच्छिंद्र अडकित्ते करत आहेत.

Web Title: accident between pickup and two-wheeler, youth dies

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here