संगमनेर ब्रेकिंग: टेम्पोचे चाक छातीवरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
Sangamner Accident News: टेम्पोचे चाक थेट दुचाकीस्वाराच्या छातीवरून गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातून जाणार्या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी शिवारातील आनंदवाडी येथे टेम्पोचे चाक थेट दुचाकीस्वाराच्या छातीवरून गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. 12 सप्टेंबर रोजी सकाळी पावने नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे वरूडी पठार गावावर शोककळा पसरली आहे संदीप जाधव रा. वरुडी पठार या तरूणाच्या दुर्दैवी मृत्यूने वरूडी पठार गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संदीप मारूती जाधव (वय 33 रा. वरूडी पठार) हा तरूण मंगळवारी सकाळी चंदनापुरी शिवारातील आनंदवाडी शिवारात आला असता त्याच दरम्यान टेम्पो चालक लहु सुधाकर दहीफळे (रा. लातुर) याने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात जाधव हा तरूण खाली पडला आणि त्याच्या छातीवरून चाक गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर टोलनाक्याच्या कर्मचार्यांसह डोळासणे महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनीही घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त दोन्ही वाहने महामार्गावरून बाजूला घेण्यात आली. दरम्यान संदीप जाधव या तरूणाच्या दुर्दैवी मृत्यूने वरूडी पठार गावावर शोककळा पसरली आहे.
Web Title: Accident Bike rider dies after tempo’s wheel runs over his chest
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App