Home Accident News भीषण अपघात: वऱ्हाड घेऊन जाणारी बोलेरो जीप विहिरीत कोसळली, सात जण ठार-...

भीषण अपघात: वऱ्हाड घेऊन जाणारी बोलेरो जीप विहिरीत कोसळली, सात जण ठार- Accident

Accident Bolero jeep carrying bride crashes into well, killing seven

मध्यप्रदेश: छिंदवाडा येथे भीषण अपघाताची (Accident) मोठी दुर्घटना घडली आहे. लग्नाच्या वऱ्हाडी मंडळीने भरलेली बोलेरो जीप विहीरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात सात जण ठार (Death) झाले असून सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारी रात्री एक वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की,  हा अपघात छिंदवाडा जिल्ह्यातील मोहखेडा पोलीस स्टेशन परिसरात झाला. परिसरातील कोडामाळ गावात बुधवारी रात्री वऱ्हाडी मंडळींनी भरलेली बोलेरो जीप विहिरीत पडली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. सात मृतदेह आणि बोलेरो विहिरीतून बाहेर काढण्यात आली.

भाजीपाणी गावात मिरवणूक निघाली होती. बुधवारी रात्री उशिरा मिरवणुकीवरून परतत असलेली बोलेरो गाडी दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात विहिरीत कोसळून अपघात घडला. यादरम्यान जीपमधील निष्पाप बालकासह सात जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बोलेरो क्रेनच्या मदतीने बाहेर काढली, आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

Web Title: Accident Bolero jeep carrying bride crashes into well, killing seven

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here