भीषण अपघात, पुलावरून बस कोसळली…
Breaking News | Parbhani Accident: परभणी जिल्ह्यात भीषण अपघात झाला, पुलावरून 50 फूट खोल खाली बस कोसळली.
परभणी: परभणीत पुलावरून 50 फुट खोल बस कोसळली, 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. परभणी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. परभणीत पुलावरून 50 फूट खोल खाली बस कोसळली आहे. परभणीच्या जिंतुर तालुक्यातील अकोली येथे जिंतूरहुन सोलापूरला जात असलेली बस नदीच्या पुलावरून खाली कोसळली आहे. या अपघातात बसमधील 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना तात्काळ बाहेर काढून, त्यांना खाजगी गाड्यांमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने वळणावरून बस तब्बल 50 फूट खोल नदीपत्रात कोसळली. बस पलटी झाल्याने बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, स्थानिक नागरिक देखील मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळत आहे. सर्व जखमींना तात्काळ जिंतुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिंतुर-सोलापुर ही बस सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जिंतूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली पुलावरून जात असतानाच अपघात झाला.
डंपर-पीकअपच्या अपघातात 4 मजूर ठार
चाळीसगाव: सध्या रेल्वेच्या तिसऱ्या लाइनचे काम सुरू आहे. तळेगाव गावाजवळील काम आटोपून काही परप्रांतीय मजूर रात्री अकराच्या सुमारास डंपरने घराकडे परतत होते. त्याचवेळी चाळीसगावकडून नाशिककडे भाजीपाला घेऊन जाणारी पीकअप गाडी समोरून येत होती. दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
हा अपघात इतका भीषण होता, की डंपर जागेवरच उलटला. त्यामुळे डंपरमधील काही मजूर फेकले गेले, तर काही डंपरखाली दाबले गेले. अपघातात एका महिलेसह एक जागीच ठार झाल्याचे घटनास्थळी मदतकार्य करणाऱ्यांनी सांगितले.
Web Title: accident, bus fell from the bridge
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study