Home Accident News उसाने भरलेल्या ट्रॉलीला कारची भीषण धडक, एकाच कुटुंबातील तीन जण ठार

उसाने भरलेल्या ट्रॉलीला कारची भीषण धडक, एकाच कुटुंबातील तीन जण ठार

Accident car hit the trolley full of sugarcane three death

पुणे | Pune Accident: उसाच्या ट्रॉलीला भरधाव कारची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बारामती-मोरगाव रस्त्यावर तरडोलीनजिक हा अपघात घडला. या अपघातात बारामतील प्रसिद्ध सराफा व्यापारी व्यावसायिक श्रेणिक भंडारी यांच्या कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात अश्विनी श्रेणिक भंडारी (वय 48), मिलिंद श्रेणिक भंडारी (वय 24), कविता उदय शहा (वय 62 रा. सर्व सुभाष चौक बारामती) बिंदिया सुनील भंडारी या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. त्यांना पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भंडारी कुटुंबीय धार्मिक कार्यक्रमासाठी पुण्याला गेले आहे. कार्यक्रम संपवून बारामतीला निघालेले असताना तरडोलीपासून पुढे आल्यानंतर उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने भंडारी कुटुंबियाच्या कारने ट्रॉलीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. गाडीची धडक जोरदार असल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला असून एक महिला यात गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताने भंडारी व कळसकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. श्रमिक भंडारी हे बारामतीतले सराफ व्यावसायिक आहेत. हे कुटुंबीय अत्यंत मनमिळावू आणि धार्मिक स्वभावाचे आहेत. त्यामुळे बारामतीकरांमध्ये शोककळा पसरली आहे.

Web Title: Accident car hit the trolley full of sugarcane three death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here