Home Accident News अहमदनगर: कारची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू

अहमदनगर: कारची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar Accident: रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून कारची धडक बसून झालेल्या अपघातात कार चालकाचा मृत्यू.

Accident Car hits container death of one

अहमदनगर: रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून कारची धडक बसून झालेल्या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला. मैनुद्दीन कलींदर शेख (वय ४५ रा. कोयाळ, ता. आष्टी, जि. बीड) असे मयत कार चालकाचे नाव आहे.

सदरची घटना सोमवारी (दि. १८) घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मैनुद्दीन शेख हे त्यांच्याकडील कार घेऊन सोलापूर रस्त्यावरून जात असताना साकत (ता. नगर) शिवारात शिवसागर हॉटेल समोर रस्त्यात उभ्या असलेल्या कंटनेरला कारची धडक बसून अपघात झाला. यात गंभीर जखमी झालेल्या मैनुद्दीन शेख यांना उपचारासाठी त्यांचा चुलत भाऊ शब्बीर अब्दुल शेख यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याबाबतची खबर मेडिकल ऑफिसर डॉ. ढगे यांनी नगर तालुका पोलिसांना दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस अंमलदार लबडे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Accident Car hits container death of one

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here