Home Accident News संगमनेर: ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू

संगमनेर: ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू

Sangamner Accident: ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.

Accident Driver dies as tractor overturns

संगमनेर: तालुक्यातील पानोडी शिवारात निळवंडे उजव्या कालव्याचे होता जोरदार काम सुरु असून यांच गावातील विजय विनायक कदम (वय २५) हा तरुण याठिकाणी ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास कदम याचा मुंढे वस्तीनजिक ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती आहे अशी की, विजय विनायक कदम हा तरुण मागील काही दिवसांपासून ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. कामावरील साहित्य तसेच मंजूरांची तो ने-आण करण्याचे काम करत असे. सोमवारी आश्वी बुद्रुक येथील आठवडे बाजारासाठी तो मंजूराना ट्रॅक्टर मधून घेऊन गेला होता. रात्री उशीरा ९.३० वाजेच्या सुमारास मंजूरांना पिंप्री- लौकी येथे सोडल्यानंतर पानोडी येथील आपल्या घराकडे विजय टॅक्टर घेऊन चालला . कदम हा मुंढे वस्तीनजिक वळणावर टॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला व त्याखाली विजय दबला गेला. या रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्याची वर्दळ कमी असल्यामुळे विजयला मदत मिळू शकली नाही. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, समजलेल्या माहितीनुसार विजयच्या घरची परिस्थिती गरिबीची असून त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण व चुलते, असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात व दुर्दैवी मृत्यूमुळे पानोडीसह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

Web Title: Accident Driver dies as tractor overturns

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here