अहिल्यानगर: एसटी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दुकानात घुसली
Breaking News | Ahilyanagar Accident: एसटी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस चक्क दुकानात घुसली.
राहाता: एसटी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस चक्क दुकानात घुसली. ही घटना राहाता शहरालगत बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. मोठा अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, रात्री तीनच्या सुमारास पुणे वरून शिरपूर ला जाणारी एसटी बस एम एच २० बी एल १३४९ ही बस पुण्यावरून शिरपूरला जात असताना रात्री तीनच्या सुमारास साकुरी पुलाजवळील डॉक्टर लोढा हॉस्पिटल समोर असलेल्या रायसोनी यांच्या दुकानात घुसली. रात्री अंधार असल्याने ही घटना सकाळी सर्वांना समजली.
मात्र या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसून रायसोनी यांच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. येथे असलेल्या पत्र्याचे शेड तसेच दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना समजतात साकुरी राहाता परिसरातील नागरिकांनी अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टाळला आहे..
मयूर रायसोनी यांनी राहाता पोलीस स्टेशन येथे एस.टी महामंडळाच्या बस व ड्रायव्हर वर तक्रार दाखल केली असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
Web Title: Accident driver lost control of the ST bus, the bus rammed directly into the shop
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study