Home Ahmednagar Live News Accident: ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू

Accident: ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू

Accident driver of the tractor died on the spot

Ahmednagar News Live| Shrirampur | श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील कारखाना परिसरामध्ये पहाटे साडे तीनच्या सुमारास ट्रॅक्टर जुगाड चालक ट्रॅक्टर खाली करण्यास वेळ असल्याने शेजारील जुगाड जवळ विश्रांतीसाठी झोपी गेला. जुगाड ट्रॅक्टर मागेपुढे घेताना जुगाड ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला.  याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील कारखाना परिसरामध्ये जुगाड चालक या व्यक्तीला मयत नानासाहेब दगडू मेचे (वय 40) हे झोपलेले आहेत हे माहीत नव्हते. चालकाने जुगाड ट्रॅक्टर मागेपुढे घेताना सदर झोपलेल्या नानासाहेबाच्या अंगावरून जुगाड ट्रॅक्टर गेल्याने नानासाहेब मेचे हे जागीच ठार झाले. घटनेचे गांभीर्य ओळखत जुगाड ट्रॅक्टर चालकाने घटनेची माहिती शेजारचे वाहन चालक तसेच ग्रामस्थांना दिली.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तुषार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून मयत नानासाहेब दगडू मेचे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटल याठिकाणी आणण्यात आला. नानासाहेब मेचे यांचे नातेवाईक यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे याठिकाणी तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार संतोष परदेशी, पोलीस नाईक किरण पवार, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड करत आहेत.

Web Title: Accident driver of the tractor died on the spot

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here