Home पुणे कारचा टायर फुटल्याने अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलाचा मृत्यू

कारचा टायर फुटल्याने अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलाचा मृत्यू

Breaking News | Baramati Accident: राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात एका काँग्रेस नेत्याच्या 22 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना.  

Accident due to car tire burst Congress leader's son dies

बारामती: बारामती तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात एका काँग्रेस नेत्याच्या 22 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आदित्य निंबाळकर असं मृत तरुणाचं नाव आहे. कारचा टायर फुटल्याने ही घटना घडली. आदित्य हा इंदापूर येथील काँग्रेस नेते आबासाहेब निंबाळकर यांचा मुलगा आहे. कारचा टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अपघात घडला. अपघात इतका भयावह होता की, त्यामुळे कारचा चक्काचूर झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. आदित्य निंबाळकर हा त्याच्या कारने राष्ट्रीय महामार्गावरुन काटेवाडीकडून रुई मार्गे बारामतीत निघाला होता. त्याची कार रुई पाटीजवळून निघाली असता त्याच्या कारचा टायर फुटला. अपघात इतका मोठा होता की, टायर फुटल्याचा आणि कार आदळल्याचा आवाज परिसरात पोहोचला. आवाज ऐकून गावकरी आणि स्थानिक नागरिक आवाजाच्या दिशेने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले. त्यांनी कारमध्येच जखमी अवस्थेत अडकलेल्या आदित्य यास कारमधून बाहेर काढले. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोवर बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करुन घेतले. त्याच्यावर उपचार सुरु झाले. मात्र, त्याला झालेली दुखापत इतकी गंभीर होती की, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, आदित्य हा काटेवाडीकडून रुई मार्गे बारामतीच्या दिशेने निघाला होता. त्याची कार वेगात होती. दरम्यान, त्याची कार रुई पाटीवर आली असताच कारचा टायर फुटला. टायर फुटताच कार पलटी झाली आणि रस्त्यालगत असलेल्या एका इमारतीच्या कोपऱ्यावर जाऊन आदळली. या घटनेत कारचा चक्काचूर झाला. याच कारमध्ये आदित्य अडकून पडला. स्थानिक जेव्हा त्याच्या मदतीसाठी पोहोचले तेव्हा तो कारमध्ये जखमी अवस्थेत आढळून आला.

Web Title: Accident due to car tire burst Congress leader’s son dies

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here