Home अहमदनगर अहिल्यानगर: पिकअपवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात; दोघे ठार

अहिल्यानगर: पिकअपवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात; दोघे ठार

Ahilyanagar Accident: चुकीच्या बाजूने वाहन चालविणाऱ्या चालकाचा माल वाहतूक पिक-अपवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघात दोघे जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी.

accident due to loss of control of pickup; Both killed

राहुरी: राहुरी खुर्द येथे नगर-मनमाड महामार्गावर चुकीच्या बाजूने वाहन चालविणाऱ्या चालकाचा माल वाहतूक पिक-अपवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघात दोघे जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक तरूण तालुक्यातील पिंप्री अवघड येथील महाविद्यालयीन युवक चैतन्य विनायक लांबे (वय-१७) तर दुसरा तरूण टेंभुर्णी येथील शिवाजी बापू जाधव असल्याचे समजते.

याबाबत मिळालेली माहिती अशी, नगरकडून-राहुरीकडे भरधाव वेगाने मालवाहतूक करणारी पिकअप (Pickup) येत असताना राहुरी खुर्द येथील महामार्गालगत असलेल्या देवस्थानाजवळ या चालकाने तो राहुरीकडे येत असलेल्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाल्याने त्याने दुभाजक ओलांडून त्याची पिकअप वळवून चुकीच्या बाजूने भरघाव वेगाने चालू लागला. त्यानंतर त्याचा वाहनावरील ताबा सुटला.

यावेळी हे वाहन भरधाव वेगात असल्याने समोरून येणार्‍या दोन दुचाक्या व काही वाटसरूंना उडविले. या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले. तर तीन वाटसरू गंभीर जखमी झाले आहेत. यातील काही जखमींना राहुरीच्या ग्रामीण रूग्णालयात तर काहींना नगर येथे उपचारासाठी नेले असल्याची माहिती मिळते.

Web Title: accident due to loss of control of pickup; Both killed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here