Home Accident News आयशर ट्रक दरीत कोसळून २ ठार

आयशर ट्रक दरीत कोसळून २ ठार

Accident News: कसारा घाटातील हिवाळा ब्रिजजवळ मध्यरात्रीच्या सुमारास ही अपघाताची घटना.

Accident Eicher truck falls into valley, 2 killed

इगतपुरी: मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीनशे फूट खोल दरीत आयशर ट्रक कोसळल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा ट्रक खाली असलेल्या हिवाळा ब्रिज या रेल्वे पुलाच्या रेल्वे ट्रॅकवर पडला नाही. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

कसारा घाटातील हिवाळा ब्रिजजवळ मध्यरात्रीच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली असून संरक्षक भिंतीचे कठडे तोडून ट्रक ३०० फूट खोल दरीत कोसळला. यामध्ये गणेश दुशिंग (२२) व राहुल रामेश जाधव (२४) हे दोघे जण ठार झाले.

Web Title: Accident Eicher truck falls into valley, 2 killed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here