Accident: गॅसच्या पाईपलाईनला कार धडकून अभियंता ठार
नेवासे | Accident: नगर औरंगाबाद महामार्गावर खडका फाट्यानजीक पतंजली कंपनी समोर महामार्गालगत सुरु असलेल्या गॅस पाईपलाईनच्या पाईपवर कार धडकून अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. राजकुमार नारायण बडवे असे मयत अभियंतेच नाव आहे.
चिखली येथून चार वाजेच्या सुमारास पनवेल येथे जाण्यासाठी सिडको मुंबईचे अभियंते राजकुमार व त्याच्या सोबत अरुण सोपानराव जाधव, कमलाकर शेषराव कांबळे हे निघाले होते. खडका फाट्यानजीक आले असता गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या गॅसच्या पाईपलाईनवर त्यांची गाडी धडकली. यात राजकुमार बडवे ठार झाले. तर इतर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नेवासा फाटा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनास्थळी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे व पोलीस पथकाने धाव घेतली. तेथे बडवे यांना मयत घोषित करण्यात आले. तर दोन जणांवर उपचार सुरु आहेत.
Web Title: Accident engineer was killed when the car hit the pipeline