घरी परतताना काळाची झडप, तिघांचा अंत, भरधाव ट्रकची कारला धडक
Amravati Accident: भरधाव ट्रकची कारला धडक झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर एक गंभीर जखमी.
अमरावती : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भरधाव ट्रकची कारला धडक झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास वडुरा गावाजवळ ही घटना घडली.
अजय यादव, ऋषिकेश कराळे व रजत मेश्राम, अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. या अपघातामध्ये सुनील गोंदूरवार हा युवक जखमी झाला आहे. हे चौघेही एक वाजताच्या सुमारास कारने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून जात असताना त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग व बडनेरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी सुनील यांना त्यांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी , वरील नावे असलेले चारही तरुण वाहन क्रमांक २७ बीएल ६६९९ हे शनिवारी रात्री बडनेरा सुपर हायवेवरुन घरी परत येत होते. त्यावेळी त्यांच्या कारला अज्ञात ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
अपघाताची माहिती बडनेरा पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने मृत आणि जखमींना तात्काळ अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास बडनेरा पोलिस तपास करत आहेत.
Web Title: Accident home, the suddenness of time, the end of the three, a speeding truck collided with a car
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study