कात्रज घाटात बोगद्यात मोठा अपघात, पाच वाहने एकमेकांना धडकली
Katraj Ghat Accident: चार मोटारी एकमेकांना आदळल्याने अपघात.
पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्यात शुक्रवारी दुपारी मोठा अपघात झाल्याची घटना घडली. बोगद्यात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एक मोटार अचानक थांबली. त्यापाठोपाठ चार मोटारी एकमेकांना आदळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्यात शुक्रवारी दुपारी दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी साताऱ्याकडून पुण्याकडे निघालेली मोटार अचानक थांबली. त्यापाठोपाठ पाठीमागून येणाऱ्या मोटारी आदळल्या. अपघातात मोटारींचे नुकसान झाले.
अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त मोटारी बाजूला काढण्यात आल्यानंतर अर्धा तासात वाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.
Web Title: accident in Katraj Ghat tunnel, five vehicles collided with each other
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App