Accident | संगमनेर: स्विफ्ट कार व दुचाकीत भीषण अपघात
Sangamner Accident News: लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर नान्नज दुमाला शिवारात गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
संगमनेर: स्विफ्ट कार व दुचाकीत धडक होऊन भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला शिवारात घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर नान्नज दुमाला शिवारात गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्याने स्विफ्ट कार (क्र. एमएच 15 एचवाय 0954) मधून चालक लोणीच्या दिशेने प्रवास करत होता. दरम्यान नांदूर शिंगोटेच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीची (क्र. एमएच 17 एएक्स 6589) व स्विफ्ट कारची नान्नजदुमाला शिवारात समोरासमोर जोराची धडक झाली. झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दत्तू सुखदेव लहामगे (वय 50, रा. मनेगाव ता. कोपरगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रफिक पठाण व पोलीस नाईक अनिल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. दरम्यान अपघातानंतर स्विफ्ट कार चालक मात्र पसार झाला. संगमनेर तालुका पोलिसांनी या अपघाताच्या घटनेचा तपास सुरू केला आहे. अपघातात स्विफ्ट कार व दुचाकीचे मोठे नुकसान झाले. संगमनेर तालुका पोलिसांनी अपघाताच्या घटनेचा तपास करीत आहे.
Web Title: accident in swift car and two wheeler