अहमदनगर: ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात, दोन ठार तर पोलीस कर्मचारी
Ahmednagar Accident: औरंगाबाद कडून नगर कडे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून कंटेनरने जोरदार धडक दिल्याने अपघात. दोन ठार तर एक पोलीस कर्मचारी जखमी.
अहमदनगर: नगर औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास चौकात रविवार दि. ६ रोजी पहाटे दोनच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद कडून नगर कडे जाणाऱ्या ट्रकला (क्र. एम. एच.४३ वाय ७७४०) पाठीमागून कंटेनरने (क्र. एम. एच. १२ जे.एस. ९१९९) जोरदार धडक दिल्याने अपघात घडला. हा अपघात शेंडी बायपास चौकात घडला असून धडक इतकी भीषण होती की कंटेनरच्या केबिनचे संपूर्णपणे नुकसान झाले आहे. कंटेनर मध्ये लोखंडी सळया असल्याने त्या केबिनमध्ये घुसल्याने कंटेनर मधील कृष्णा रघुनाथ सानप ( वय २५ रा. रामनगर ता. गेवराई जिल्हा बीड) व एका अज्ञात इसमाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. तर चौकात बंदोबस्तासाठी असणारे पोलीस कर्मचारी संभाजी खलाटे जखमी झाल्याची माहिती मिळाली. वाहतुक बंदोबस्तासाठी असणारे पोलिसांनी तत्परता दाखवत बाजूला गेल्याने ते बचावले.
Web Title: accident involving truck and container, two killed
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App