डंपरच्या धडकेनंतर टॅंकर खाली चिरडून नवविवाहित महिलेचा जागीच मृत्यू
Pune Accident: किरकटवाडी फाट्याजवळ रामेश्वर पतसंस्थेच्या समोर भरधाव डंपरने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीवरील नवविवाहित महिलेचा समोरुन येणाऱ्या टॅंकरखाली पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना.
पुणे: सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळ रामेश्वर पतसंस्थेच्या समोर भरधाव डंपरने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीवरील नवविवाहित महिलेचा समोरुन येणाऱ्या टॅंकरखाली पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शिवाणी शैलेश पाटील (वय 24, रा. स्वप्नपूर्ती हाइट्स, किरकटवाडी ता. हवेली) असे या अपघातात मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
शिवाणी पाटील या आपल्या पतीसह दुचाकीवरून कामाला निघाल्या होत्या. किरकटवाडी फाट्याजवळील रामेश्वर पतसंस्थेच्या समोर वाहनांची वर्दळ असताना मागून आलेल्या अवजड डंपरने दुचाकीला धडक दिल्यानंतर शिवाणी पाटील पतीसह रस्त्यावर पडल्या. त्याच वेळी समोरुन येत असलेल्या पाण्याच्या टॅंकरचे चाक शिवाणी पाटील यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर व टॅंकर ही दोन्हीही वाहने घेऊन संबंधित चालक पसार झाले आहेत. पोलिसांकडून दोन्हीही वाहनांचा शोध सुरू असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली आहे.
असा झाला अपघात सीसीटीव्ही कॅमेरऱ्यातील दृश्यांनुसार नांदेड फाट्याकडून एक दुचाकी जयप्रकाश नारायण नगरकडे वळण्यासाठी विरूद्ध बाजूने आल्याने डंपर चालकाने अचानक डंपार उजवीकडे घेतला. त्याच वेळी ओव्हरटेक करत असलेल्या दुचाकीला डंपरचा जोरात धक्का लागला व दुचाकीवरील व्यक्ती खाली पडल्या. समोरुन येत असलेल्या टॅंकरचे चाक महिलेच्या थेट डोक्यावरून गेल्याने महिलेचा यात जागीच मृत्यू झाला.
“डंपर व टॅंकर या दोन्ही वाहनांचा शोध सुरू आहे. अपघाताचा व्हिडिओ मिळाला असून लवकरच दोन्ही वाहने व चालक सापडतील. दुर्दैवाने महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.” सचिन वांगडे, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.
Web Title: Accident newly married woman died on the spot after being crushed by a tanker after being hit by a dumper
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App