Home Accident News अहमदनगर ब्रेकिंग: कंटेनरच्या धडकेत एसटी पलटी

अहमदनगर ब्रेकिंग: कंटेनरच्या धडकेत एसटी पलटी

Ahmednagar Accident:  कंटेनर आणि एस.टी. बस यांच्यात भीषण अपघात, बस अर्धी पलटी, दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान, प्रवासी सुखरूप बचावले.

Accident ST overturned on impact with the container

पारनेर | Parner: नगर-पुणे महामार्गावर सोमवारी दुपारी कामरगाव (ता. पारनेर) येथे एसटी बस व कंटेनर यांच्यात अपघात होऊन दोन्हीही वाहनाचे मोठे नुकसान झाले. यात सुदैवाने एसटीमधील प्रवासी आणि चालक- वाहक हे सुखरूप बचावले आहेत.

युटूब वरून कसे पैसे कमवायचे | Earn Money Online

याबाबत प्रत्यक्षदर्क्षी एसटीमध्ये प्रवास करणारे गोगटे यांनी सांगितले, मंडणगड डेपोची बस क्रमांक एमएच 20 बीएल 2779 ही एसटी बस शिर्डीकडून  नगर-पुणे महामार्गावरुन जात असतांना सोमवारी दुपारी कामरगाव शिवारात आल्यावर कंटेनर (एमएच 46 सीएम 6559) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व तो कंटेनर एसटी बसवर जोरात आदळून पुढे पलटी झाला. एसटी बस चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला घेण्याचा पुरेपुर प्रयत्न केला.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

त्यामुळे गाडी रोडच्या बाजूला जाऊन तिरपी अर्धवट पल्टी झाली. परंतु एसटीबसमधील  कुणालाही काहीही झाले नाही. एसटीमध्ये चालक वाहकासोबत 41 प्रवासी होते. सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना इतर बसमध्ये बसवून मार्गस्थ केले असल्याची माहिती चालक पाडूरंग दाते यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असुन त्यांनी सविस्तर माहिती घेत पंचनामा केला.

Web Title: Accident ST overturned on impact with the container

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here