Home Accident News पत्नीला कार शिकवायला गेला अन कार थेट विहिरीत, तिघांचा मृत्यू

पत्नीला कार शिकवायला गेला अन कार थेट विहिरीत, तिघांचा मृत्यू

Buldhana Accident: कार शिकवत असताना कार विहिरीत कोसळल्याची घटना, मायलेकीसह तिघांचा मृत्यू.

Accident teach his wife to drive and the car went directly into the well, three died

बुलढाणा:  बुलढाण्यातील देऊळगाव राजा शहराच्या रामनगर परिसरात टाटा टियागो कार विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मायलेकीसह तिघांचा मृत्यू झाला आहे.  कारमध्ये तीन जण होते, त्यामधील चालक सुखरुप बचावला आहे. पण आई आणि मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. चाळीस फूट विहिरीत कारचा शोध घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचाही मृत्यू झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, शाळेला सुट्टी असल्याने पत्नीला कार शिकवणे सुरू होते. यादरम्यान कार शिकवत असताना कारवरील पत्नीचे नियंत्रण सुटलं आणि कार थेट विहिरीत जाऊन पडली. यात पत्नी व मुलीचा मृत्यू झाला असून पतीला दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. तर यावेळी शोध कार्य करणारा पवन पिंपळे नामक युवक हाही या विहिरीत बुडून मरण पावला. ही घटना देऊळगाव राजा येथील रामनगर परिसरात घडली. व्यवसायाने शिक्षक असलेले अमोल मुरकुट यांनी या दिवाळीला टाटा नेक्सन ही कार खरेदी केली होती. स्वतःलाही कार नीट चालवता येत नसताना त्यांनी पत्नीला ही कार शिकवण्याचा घाट घातला. दुपारी बारा वाजता ते आपल्या घरून निघाले होते. पत्नीला ड्रायव्हिंग सीटवर बसवून अमोल मुरकुटे बाजूच्या सीटवर बसले होते. दहा वर्षाच्या मुलीला मागील सीटवर बसवलं होतं. पत्नीला कार शिकवत असताना ब्रेक दाबण्याऐवजी स्वाती मुरकुट यांनी चुकून एक्सलेटरवर पाय ठेवला आणि कार थेट विहिरीत जाऊन कोसळली. जवळपास 70 फूट खोल असलेल्या या विहिरीला 40 फूट पाणी होतं.  बचाव कार्य लवकर होऊ शकले नाही. अमोल मुरकुट हे कारच्या खिडकीतून कसाबसा आपला जीव वाचवत बाहेर पडले. मात्र अमोल मुरकुट यांच्या पत्नी स्वाती आणि मुलगी सिद्धी ही कार सह 40 फूट खोल पाण्यात बुडाल्यात तात्काळ पोलिसांनी रुग्णवाहिका अग्निशमन दल यांना माहिती देण्यात आली. मात्र सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर कारसह स्वाती व मुलगी सिद्धी यांचा मृतदेह (Dead body) बाहेर काढण्यात आला. यावेळी बचाव कार्यादरम्यान अजूनही एक युवक जखमी झालेला आहे. अमोल मुरकुट यांच्यावर ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथे उपचार सुरू असून याप्रकरणी पोलिसाचा अधिक  तपास करीत आहेत.

पवन तोतराम पिंपळे ( २४ ) वर्षीय तरुण कार मधील मृतदेह शोधण्यासाठी विहिरीत उतरला असताना बुडाल्याने मरण (Died) पावला. तरुणाचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला आहे. 

Web Title: Accident teach his wife to drive and the car went directly into the well, three died

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here