शिर्डीकडे येणाऱ्या कारला अपघात; चौघांचा जागीच मृत्यू
Breaking News | Ahmednagar: समृद्धी महामार्गांवर स्विफ्ट डिझायर कार व कंटेनरच्या अपघातात चार जण ठार झाल्याची घटना.
कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गांवर स्विफ्ट डिझायर कार व कंटेनरच्या अपघातात चार जण ठार झाल्याची घटना शुक्रवार दि.९ फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे.
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर एक कंटेनर उभा असताना त्यातील चॅनल खाली पडलेला होता, हा चॅनल कंटेनर चालक उचलत असताना जालन्याकडून शिर्डीकडे स्विफ्ट डिझायर कार भरधाव येत होती. स्विफ्ट डिझायर कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने समोर असलेला कंटेनर चालकाला धडक देत कार समोरील कंटेनरवर जाऊन आदळली. यां अपघातात कार चक्काचूर झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी असून त्याला उपचारासाठी वैजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व चौघाचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रीया सुरू होती.
Web Title: Accident to Shirdi-bound car Four died on the spot
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study