Home Maharashtra News Accident:  शिवसेना खासदाराच्या गाडीवर कोसळले झाड

Accident:  शिवसेना खासदाराच्या गाडीवर कोसळले झाड

Accident Tree fell on Shiv Sena MP's car

मुंबई: मुंबई येथील आमदार निवासाबाहेर खासदार ओमराजे निंबाळकर यांची गाडी उभी असताना गाडीवर भले मोठे झाड उन्मळून पडल्याची (Accident) घटना घडली आहे. यावेळी गाडीत कोणीही नव्हते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.  

मुंबईत शनिवारी आणि रविवारी सकाळी जोरदार वादळी पाऊस झाला. मुंबईतील तो यंदाच्या मोसमातील पहिलाच मोठा पाऊस होता. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडल्याचे वृत्त आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने खासदार ओमराजे निंबाळकर हे मुंबईत होते. पहिल्याच पावसात मुंबईतील आमदार निवास समोरील मोठे झाड उन्मळून पडले आहे. मुंबईमधील आकाशवाणी आमदार निवासाबाहेर खासदार निंबाळकर यांची गाडी होती. त्या गाडीवर या वादळी पावसात एक भले मोठे झाड उन्मळून पडले आहे. ज्या वेळी झाड हे गाडीवर पडले, त्यावेळी गाडीत कोणीही नव्हते,  त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, निंबाळकर यांच्या गाडीचे मोठे नुकसान झालेले आहे.

Web Title: Accident Tree fell on Shiv Sena MP’s car

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here