Home Accident News Accident: केमिकल पावडर घेऊन जाणारा ट्रक घाटात उलटला

Accident: केमिकल पावडर घेऊन जाणारा ट्रक घाटात उलटला

Accident truck carrying chemical powder overturned in the ghat

पाथर्डी | Accident:  पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात मुंबईहुन परभणीकडे केमिकलची २६ टन पावडर घेऊन जात असलेला पलटी झाल्याची घटना घडली आहे. ट्रकचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने हा ट्रक एका धोकादायक वळणावर हा अपघात घडला. ही घटना बुधवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारस घडली.

या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकमधील केमिकलच्या पावडरचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रक चालक हनुमंत तोंडे व हरीश मुंडे (राहणार माजलगाव) हे या अपघातातून सुदैवाने बचावले आहेत. नवरात्रातली सातवीमाळ असल्यामुळे मोहटा देवीच्या दर्शनाससाठी जाणाऱ्या भाविकांची रस्त्याने मोठी गर्दी होती. या घाटात दिवसभर वाहतुकीची कोंडी होती.

केमिकलची पावडर आहे हात लावू नका असे आवाहन अपघातग्रस्त ट्रक चालकाकडून प्रवाशांना करण्यात येत होती. तरी देखील अनेक प्रवाशांना ही पिवळसर पावडर हातात घेवून पाहण्याचा मोह सोडलेला नाही. या अपघातात केमिकल पावडरचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: Accident truck carrying chemical powder overturned in the ghat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here