Home Accident News संगमनेर तालुक्यात मालट्रक पुलावर उलटला, ट्रकखाली दुचाकी दबली, युवकाने घेतली उडी

संगमनेर तालुक्यात मालट्रक पुलावर उलटला, ट्रकखाली दुचाकी दबली, युवकाने घेतली उडी

Accident truck overturned on a bridge in Sangamner taluka

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजारतळानजीक असलेल्या अपघाती वळण पुलावर मालट्रक उलटल्याची घटना घडली. यावेळी ट्रक अंगावर येत असल्याचे लक्षात येताच तत्काळ दुचाकीस्वरांनी उडी फेकल्याने दुचाकीस्वार बचावला. रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.  

तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने पावडर मटेरीयल गोण्या भरलेला  मालट्रक एमएच ४५, एएफ ९५७७ नाशिकच्या दिशेने जात होता. मालट्रक तळेगाव दिघे बाजारतळानजीक आली असता अरुंद रस्ता असल्याने अपघाती वळण पुलावर ट्रक उलटला. त्याचवेळी समोरून दुचाकीवरून किरण रामनाथ दिघे हा तरुण गावात येत होता मात्र मालट्रक अंगावर येत असल्याचे लक्षात येताच त्याने दुचाकीवरून उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला. दुचाकी मात्र मालट्रकखाली दबली गेली. हा अपघात घडल्याने वाहतूक काही काही काळ विस्कळीत झाली होती.

संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लक्षमण औटी, बाबा खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला.

सदर अपघाती वळण रस्त्यावर व पुलावर यापूर्वी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. जीवितहानी झालेली आहे. त्यानुळे या ठिकाणी रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे आहे, सदर रस्त्याची व पुलाची दुरुस्ठी करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा युवक कार्यकर्ते अमोल दिघे यांनी दिला आहे.  

Web Title: Accident truck overturned on a bridge in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here