Home Ahmednagar Live News भयानक! भरधाव ट्रकने तीन वाहनांना उडवले,  २ जण जागीच ठार, 10 जण...

भयानक! भरधाव ट्रकने तीन वाहनांना उडवले,  २ जण जागीच ठार, 10 जण जखमी

Accident truck rammed three vehicles, killing two on the spot and injuring 10 others

Ahmednagar | कर्जत | Karjat:  नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील कोकणगाव जवळ असणाऱ्या बोरुडेवस्ती येथे चार वाहनांचा गुरुवारी रात्री ९ वाजता भीषण अपघात (Accident) होऊन दुचाकीवर असणारे कृष्णा मल्हारी बोरुडे (वय २५) तसेच क्रुझर मधील सोपान दिनकर काळे हे दोघेजण जागीच ठार झाले. इतर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरमुळे झाला .

या अपघातातील मुख्य आरोपी असणारा माल ट्रक ड्रायव्हर यांनी तीन वाहनांना जोरदार धडक दिली दोन जण जागीच ठार झाले, अनेक जण गंभीर रित्या जखमी झाले जखमी झालेले आरडाओरडा करत होती वेळ होती अशा परिस्थितीमध्ये ट्रक ड्रायव्हर यांनी गाडी न थांबता किंवा कोणतीही मदत न करतात तो त्या ठिकाणावरून गाडी घेऊन पसार झाला.. यानंतर पोलिसांनी त्या ट्रक ला पकडले मात्र चालक पळून जाण्यात यशस्वी झाला.

याबाबत माहिती अशी की , नगरहून सोलापूरकडे जात असणारा मालट्रक क्रमांक टी एन ८८ एक्स ९२४३ याने नगरहून सोलापूर कडे जात असलेला ॲपे रिक्षा क्रमांक डी एम ४५५७ यास पाठीमागून जोरदार धडक दिली, या धडकेने हॅप्पी रिक्षा रस्त्याच्या कडेला खाली जाऊन तिला अपघात (Accident) झाला. यानंतर ॲपेच्या पुढे दुचाकी जात होती त्याला देखील या ट्रकने पाठीमागून जोरात धडक दिली व अक्षरशः काही अंतर त्या दुचाकीला फरफटत नेले.

दुचाकीस्वार कृष्णा मल्हारी बोरुडे ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. दरम्यान त्याच वेळी सोलापूर हुन नगर कडे जात असणार क्रुझर जीप क्रुझर क्रमांक एम एच ०९ बी एम ९८५९ ती समोरून येत होते समोरील अपघात टाळण्याचा प्रयत्न क्रुझर ड्रायव्हर करत असताना या मार ट्रकने क्रुझर जीपला देखील ठोकले, यामध्ये क्रूजर मधील सोपान दिनकर काळे हा जागीच ठार झाला.

अपघाताची माहिती मिळताच त्या परिसरातील नागरिक व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या ट्रकने दिलेल्या धडकेतमध्ये किमान दहा जण गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यासर्वांना तात्काळ रुग्णवाहिकेचे मधून नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Web Title: Accident truck rammed three vehicles, killing two on the spot and injuring 10 others

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here