Home अहमदनगर अहमदनगर: आयशरच्या धडकेत मोटारसायकलवरील दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू

अहमदनगर: आयशरच्या धडकेत मोटारसायकलवरील दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू

Ahmednagar News: भरधाव आयशरने मोटारसायकलला धडक दिल्याने अपघातात (Accident) शेतकरी कुटुंबातील दोघा भावांचा मृत्यू झाल्याची घटना.

Accident Two brothers on motorcycle killed in collision with Eicher

श्रीरामपूर:  तालुक्यातील भोकर शिवारात श्रीरामपूर-नेवासा राज्य मार्गावर भरधाव आयशरने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात काकांच्या दहाव्याहून घरी परतत असलेले नेवासा तालुक्यातील निपाणी निमगाव येथील शेतकरी कुटूंबातील दोघा सख्या भावांचा गंभीर जखमी होवून त्यांना उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने निपाणी निमगाव गावावर शोककळा पसरली आहे.

अपघात घडल्यानंतर जि.प. शाळेच्या प्रश्न पत्रिका घेवून जाणारा ट्रक राज्य मार्गाच्या साईड गटारमध्ये उलटला व ट्रक चालक पसार झाला. याबाबत रात्री उशीरापर्यंत तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. जखमींना दवाखान्यात हलविण्यासाठी परिसरातील तरूणांनी मदत केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्ग क्र.44 वर काल शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नेवासा तालुक्यातील निपाणी निमगाव येथील नवले कुटूंबातील कर्ते पुरूष असलेले सख्ख्ये भाऊ शरद विनायक नवले (वय-36) व अविनाश विनायक नवले (वय-30) हे दोघे आपल्या जवळील मोटारसायकल (क्र.एमएच 17 एक्यू 8685) हिने श्रीरामपूरकडून राहता तालुक्यातील काकांच्या दहाव्याहून निपाणी निमगाव येथे आपल्या घरी जात असताना समोरून नेवाशाकडून श्रीरामपूरकडे जिल्हा परिषद शाळांच्या इयत्ता तिसरी ते आठवीच्या पहिल्या सत्रातील प्रश्नपत्रिका घेवू चाललेला आयशर (क्र.एमएच 12 टी व्ही 4092) या भरधाव वाहनाने विरूद्ध दिशेने येवून या मोटार सायकलला जोराची धडक दिली व राज्य मार्गाच्या लगतच्या साईड गटारात जावून उलटला. ट्रक चालकाने प्रसंगावधान बघून ट्रकमधून बाहेर पडत पळ काढला.

हा अपघात झाल्याचे लक्षात येताच जवळच काळे वस्तीतील तरूण अरूण काळे, दिपक काळे व रावसाहेब काळे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. त्याचवेळी इतर वाहन चालकांबरोबरच येथील सोसायटीचे अध्यक्ष गणेश छल्लारे, संचीत गिरमे, धनगर समाज समितीचे तालुकाध्यक्ष राजु तागड, सावता परिषदेचे ज्ञानेश्वर शिंदे, झुंबर शिंदे, नानासाहेब काळे, प्रतिक काळे आदिंनी गंभीर जखमी नवले बंधूना रूग्णवाहिका पाचारण करून उपचारासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार रूगणलयात रवाना केले.

अपघाताचे वृत्त समजताच तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि.दशरथ चौधरी यांनी अपघातग्रस्त आयशर व मोटारसायकल पोलीस ठाण्यात रवाना करत वाहतुक सुरळीत केली. यावेळी त्यांच्या समवेत पोलीस हवालदार राजु त्रिभुवन, अर्जून बाबर, पोलीस पाटील बाबासाहेब साळवे, पोलीस मित्र बाबा सय्यद व गृहरक्षक दलाचे सुभान शेख यांनी तातडीने वाहने ताब्यात घेवून आयशर चालकाचा शोध सुरू केला. या आयशरमध्ये पहिल्या सत्राच्या प्रश्नपत्रिका असल्याचे समजताच अपघातस्थळी परिसरातील शिक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Accident Two brothers on motorcycle killed in collision with Eicher

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here