श्रीरामपूर: दुचाकीस्वराची उसाच्या जुगाडाला धडक, चालक ठार
Ahmednagar News | Shrirampur: तीन वेगवेगळ्या अपघातांतत (Accident) एकजण ठार झाला असून तीन जण जखमी.
श्रीरामपूर : श्रीरामपूर शहराजवळ झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांतत एकजण ठार झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. यातील एकजण गंभीर जखमी झाले आहेत. श्रीरामपूर शहराजवळ दोन दिवसांत तीन वेगवेगळे अपघात झाले.
पहिला अपघात शहराजवळील रेल्वे उड्डाणपुलाजवळ घडला. त्यात रात्री ११ वाजता नेवाशाकडून श्रीरामपूरच्या दिशेने येत असताना दुचाकीस्वाराची रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या जुगाडाला धडक बसली. यात हा दुचाकी चालक ठार झाला. मयत व्यक्ती गोंडेगाव येथील असल्याचे समजते.
दुसरा अपघात संध्याकाळी सहा वाजता याच उड्डाणपुलाजवळ झाला. यात दुचाकीस्वार श्रीरामपूरहून नेवाशाच्या दिशेने जात असताना पुलाजवळ अज्ञात वाहनाने हुल दिल्यामुळे रस्त्यावर खाली पडले. यात दोघेही जखमी झाले आहेत.
तिसरा अपघात वडाळा महादेव शिवारातील ओकवूड वायनरीजवळ झाला. यात दुचाकीस्वार रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या वाहनाला धडकून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
श्रीरामपूरातील ओव्हर ब्रिजजवळ पूर्वी गतिरोधक होते; परंतु नुकतेच या रस्त्याचे काम झाल्याने तेथे गतिरोधक राहिले नाहीत. त्यामुळे पुलावरून खाली येणारी वाहने प्रचंड वेगाने येतात. खाली येताच मोठे वळण आहे. त्यामुळे पुलाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना समोरील वाहनांचा अंदाज येत नाही. परिणामी येथे मोठ्या संख्येने अपघात होत आहेत. याठिकाणी गतिरोधक बनवावेत, अशी मागणी परिसरातून होत आहे.
Web Title: Accident Two-wheeler collides with sugar cane, driver killed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App