संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर गॅस टाक्यांचा ट्रक कारवर पलटी भीषण अपघात
Sangamner Accident: गॅसच्या टाक्या घेऊन जाणारा ट्रक कारवर उलटून भीषण अपघात झाल्याची घटना.
संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर घुलेवाडी शिवारात गॅसच्या टाक्या घेऊन जाणारा ट्रक कारवर उलटून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात ट्रकचालक घनश्याम परमार, तर कारमधील भैय्या वालझाडे व चैतन्य मावळे जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी : ट्रक (जी.जे. २३, ए.टी. ४२४८) मध्ये गॅस टाक्या भरलेल्या होत्या. हा ट्रक नाशिकहून पुणे येथे चालला होता. चालक घनश्याम म्हैसभाई परमार (वय २४, बडोदा-गुजरात) याचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे हा अनियंत्रित झालेला ट्रक घुलेवाडी शिवारात कारवर (एमएच १४, के.डब्ल्यू. ६५३९) पलटी झाला. या अपघातात तिघे जखमी झाले. महामार्गावर टाक्यांचा खच पडला होता. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. पोलिसांनी गॅस टाक्या एका ठिकाणी गोळा करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
Web Title: accident when gas tank truck overturns on car
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App