Home महाराष्ट्र ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने एका महिलेचा मृत्यू,  संगमनेरचा उस ट्रॅक्टर ट्रॉलीचा चालक...

ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने एका महिलेचा मृत्यू,  संगमनेरचा उस ट्रॅक्टर ट्रॉलीचा चालक ताब्यात

Accident:  ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा धक्का लागून खाली पडल्यानंतर ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने एका महिलेचा मृत्यू.

Accident woman died after a trolley wheel ran over her head

जुन्नर:  ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा धक्का लागून खाली पडल्यानंतर ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि १४) वारुळवाडी – सावरगाव रस्त्यावर भागेश्वर दूध डेअरीच्या समोर घडली.

विद्या रमेश कानसकर (वय २३, रा. दौंडकरवाडी निमदरी, ता. जुन्नर, जि.पुणे) असे या अपघातात (Accident) मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा चालक गोरक्ष सुखदेव ढेंबरे (मु.पो. साकुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) याला ताब्यात घेतले आहे.

ऊस वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॉली एकमेकाला जोडलेल्या असल्याने मागच्या ट्रॉलीखाली सापडून या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने जन्माला येण्यापूर्वीच बाळाला आणि त्याच्या आईला आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेने नागरिक संतप्त झाले होते. याबाबत मृत महिलेचे पती रमेश कानसकर यांनी पोलिसात तक्रार दिली असून, चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.विद्या कानसकर या जुन्नर तालुक्यातील निमदरी येथील रहिवासी असून, आपल्या पती आणि आईसोबत नारायणगाव येथे चेकअपसाठी आल्या होत्या. वारूळवाडी येथून पुन्हा परतत असताना हा अपघात झाला. रस्त्यात गतिरोधक आला म्हणून विद्या या गाडीवरून खाली उतरल्या. मात्र समोर येणाऱ्या दोन जोडणाऱ्या ट्रॉली भरून ट्रॅक्टरचा ट्रॉलीचा विद्याला धक्का लागला आणि विद्या खाली रस्त्यावर पडली. यावेळी तिच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेले. विद्याला तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. गरोदर महिलेचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Accident woman died after a trolley wheel ran over her head

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here