Accident: डंपरच्या धडकेने तरुणीचा मृत्यू, वडील जखमी
पारनेर | Accident: कान्हूर पठारकडून टाकळी ढोकेश्वरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिचे वडील गंभीर जखमी झाले आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे.
संपदा सुरेश साळवे वय २५ रा. कान्हूर पठार असे या मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचे वडील सुरेश रतन साळवे रा. कान्हूर पठार हे गंभीर जखमी झाले आहे.
शनिवारी दुपारी हे मायलेक दुचाकीवरून टाकळी ढोकेश्वरहून कान्हूर पठाराच्या दिशेने चालले होते. त्याचवेळी भरधाव डंपर कान्हूर पठारहून टाकळी ढोकेश्वर च्या दिशेने येत होता. कान्हूर पठार येथील घाटात डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात संपदाचा जागीच मृत्यू झाला. तर वडील जखमी झाल्याने नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डंपरची धडक इतकी जोरात बसली की दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघातानंतर डंपर चालक पसार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले.
Web Title: Accident Young woman dies after being hit by a dumper