Home Accident News दुर्दैव ! लग्नाची खरेदी करायला गेलेल्या नवऱ्या मुलीवर काळाचा घाला

दुर्दैव ! लग्नाची खरेदी करायला गेलेल्या नवऱ्या मुलीवर काळाचा घाला

Pune Solapur highway Accident

पुणे : स्वतःच्या लग्नासाठी कपडे व इतर साहित्य खरेदी करून गावाकडे परतत असताना पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) झालेल्या अपघातात (Accident) नवऱ्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तिच्या सोबत असलेला तिचा भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.

प्रतीक्षा सदाशिव कांबळे असं २१ वर्षीय मुलीचं नाव आहे. तर, शुभम सदाशिव कांबळे हा जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा व शुभम हे दोघे भाऊ बहीण गुरुवारी सकाळी मलठण येथून पुणे शहरात दुचाकीवरून लग्नाच्या खरेदीसाठी आले होते. दिवसभरात त्यांनी पुण्यात खरेदी केली. सायंकाळी गावी परतत असताना कौठीचा मळा जवळ एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात शुभम गंभीर जखमी झाला तर प्रतीक्षाच्या डोक्याला मार लागल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून दोघांना टोल नाक्यावरील रुग्णालयात दाखल केले असता तिथे प्रतीक्षाला मृत घोषित करण्यात आले तर भाऊ शुभमवर उपचार सुरू आहेत.

भावा-बहिणीनं लग्नासाठी खरेदी केलेले कपडे व इतर साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेले पाहून बघ्यांनीही हळहळ व्यक्त केली. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक घेऊन घटनास्थळाहुन पळ काढला. यानंतर शुभमच्या मोबाइलवरून त्याच्या कुटुंबीयांना अपघाताची धक्कादायक माहिती देण्यात आली. काही दिवसांतच प्रतीक्षाचा विवाह सोहळा पार पडणार असल्याने घरात आनंदाचं वातावरण होतं. मात्र या दुर्घटनेमुळं घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title : Accidental death of a girl who went shopping for a wedding

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here