Home अकोले अकोले शहरालगतच्या वीटभट्टी वरील अल्पवयीन मुलीवर अत्याचारातील आरोपी निर्दोष

अकोले शहरालगतच्या वीटभट्टी वरील अल्पवयीन मुलीवर अत्याचारातील आरोपी निर्दोष

Ahmednagar, Akole: वीटभट्टी वरील अल्पवयीन मुलीवर अत्याचार (abuse) करून गर्भवती राहिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले अँड निखिल वाकचौरे यांच्या युक्तिवादाला यश.

Accused of abusing a minor girl acquitted

अकोले: शहरालगतच्या वीटभट्टी वरील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भवती राहिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. आरोपीचे वतीने अॅड. निखिल वाकचौरे यांनी बाजू मांडली.

नोव्हेंबर २०२० मध्ये वीटभट्टीवर काम करणाऱ्या अल्पवयीन पीडितीने तीन जणांविरोधात सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करून राहाता पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. ही घटना अकोले पोलिस स्टेशन हद्दीत असल्याने गुन्हा वर्ग करण्यात आला. यानंतर अकोले पोलिसांनी प्रवीण उर्फ अजित लक्ष्मण भोयर यास अटक करून त्याचेविरूद्ध भा.दं.वि. कलम ३७६ (२) (न) व पोक्सो कायदा कलम ५ व ६ प्रमाणे दाखल केले होते. यानंतर संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू झाला. यावेळी सरकार पक्षाचे वतीने न्यायालयात १३ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.

न्यायालयात आरोपीच्या वतीने विधीज्ञ अॅड. निखिल वाकचौरे यांनी युक्तीवाद करत साक्षीदारांची उलटतपासणी घेतली. आरोपीचे पीडित मुलीशी कधीही शारीरिक  संबंध आलेले नव्हते. पीडित मुलीचे वडिल यांनी पूर्वीच्या वादातून व वैमनस्यातून सदर गुन्ह्यात आरोपीस गुंतवले असल्याचे निदर्शनास आणून दिले. सरकारी वकिलांना पीडिता ही अल्पवयीन हे सिद्ध करता आले नाही. डीएनए रिपोर्ट देखील संशयास्पद असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणले. सरकार पक्षातर्फे मूलभूत घटनाक्रम सिद्ध करू न शकल्याने पोक्सो कायदा लागू होऊ शकत नाही, असा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. तब्बल २ वर्ष २ महिने जेलमध्ये राहिल्यानंतर प्रवीण भोयरला निर्दोष ठरविले. तो जेलमधून बाहेर आला आहे.

Web Title: Accused of abusing a minor girl acquitted

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here