Home Ahmednagar Live News चित्रिकरण व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

चित्रिकरण व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

Accused sentenced to life imprisonment for sexually abusing

श्रीगोंदा |  Shrigonda: अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असताना तिचे व्हिडीओ चित्रिकरण (Porn Video) काढून ते चित्रिकरण व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार (sexually abusing) करणाऱ्या आरोपीस श्रीगोंदा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. रामदास रोहिदास मोरे (वय 35 रा. हिरडगाव ता. श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी आई व बहिणीसोबत राहते. रामदास मोरे याने त्या मुलीचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ चित्रिकरण केले, त्याने ते चित्रिकरण त्या मुलीला दाखवुन,‘मी सांगेल तसेच तुला करावे लागेल, अन्यथा मी तुझे चित्रिकरण व्हायरल करेल’, अशी धमकी दिली होती. त्याच्या धमकीला घाबरून त्या मुलीने घरी कोणालाही काहीच सांगितले नव्हते.

एक दिवस मुलीची आई मजुरी कामाला गेल्यानंतर रामदास याने तिला त्याच्या घरी बोलून घेतले. अंघोळ करतानाचे चित्रिकरण दाखवुन धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतरही वेळोवेळी पीडितेला धमकी देत अत्याचार केला. यातून पीडिता गर्भवती राहिती आणि एका बाळाला जन्म दिला. याबाबत पीडितेने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रामदास मोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एम. पाटील यांनी केला. त्यांनी आरोपी मोरे विरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने पाच साक्षीदार तपासले. यामध्ये पीडिता, ग्रामसेवक, डॉक्टर, तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

सदर खटल्यामध्ये न्यायालयाने सरकारी पक्षाचा सबळ पुरावे ग्राह्य धरत आरोपी रामदास रोहिदास मोरे याला भादंवि. कलम 376 तसेच बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कलमान्वये दोषी धरून त्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

Web Title: Accused sentenced to life imprisonment for sexually abusing

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here