अहमदनगर: महिलेवर अत्याचार करणारा आरोपी जेरबंद
Breaking News | Ahmednagar: अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली.
अहमदनगर : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली. गणेश रावसाहेब धरम (वय २५, रा. मोहिनीनगर, केडगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
तो गेल्या सहा महिन्यांपासून फरार होता. आरोपीने एका महिलेला अश्लील फोटो व्हायरल करण्याची तसेच कुणाला सांगितल्यास कायमचे संपविण्याची धमकी देत नोव्हेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या दरम्यान वेळावेळी अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून मे २०२४ रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेंव्हापासून आरोपी फरार होता. तो कल्याण रोडवरील बायपास चौकात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी सापळा रचला. त्यात वरील आरोपी अलगद अडकला.
Web Title: Accused who assaulted woman jailed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study