धडक देऊन खून करून पसार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या
Breaking News | Ahilyanagar Murder: वाहनाची पाठीमागून जोराची धडक देत जीवे ठार मारून पसार झालेल्या आरोपीला नगर-मिरजगाव रोडवर सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक.

अहिल्यानगर : वाहनाची पाठीमागून जोराची धडक देत जीवे ठार मारून पसार झालेल्या आरोपीला नगर-मिरजगाव रोडवर सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. तेजस संजय काळे (वय १९, रा. कानगुडेवाडी, ता. कर्जत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पैशाच्या वादातून आरोपीने चारचाकीला धडक देऊन चंद्रशेखर रामदास जाधव यांचा खून केला होता. मयत मंगळवारी (दि. २८) रात्री त्यांचा
मित्र पृथ्वीराज साळुंके याच्यासोबत कारमधून जात होते. आरोपीने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. त्यात जाधव यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपी तेव्हापासून फरार होता. पोलिस आरोपीचा शोध घेत होते. आरोपी कारमधून अहिल्यानगर ते मिरजगाव रोडने जात आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने नगर-मिरजगाव रोडवर सापळा रचला. आरोपीला अटक करून त्याला पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.
Breaking News: accused who fled after hitting and killing her was put in chains
















































