Home क्राईम चंदनापुरी घाटात अल्पवयीन मुलीचा खून करणार्‍या आरोपीस अटक, या कारणामुळे हत्या

चंदनापुरी घाटात अल्पवयीन मुलीचा खून करणार्‍या आरोपीस अटक, या कारणामुळे हत्या

Sangamner Crime:  दोघांमध्ये भांडण झाले, संतापाच्या भरात आरोपीने तिच्या डोक्यात दगड टाकून तिला ठार (Murder) केले.

he accused who killed a minor girl in Chandnapuri ghat arrested, murder due to this reason

संगमनेर:  तालुक्यातील चंदनापुरी घाटामध्ये अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. याबाबत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील नाशिक- पुणे महामार्गावरील जुन्या चंदनापुरी घाटामध्ये सडलेल्या अवस्थेमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी याबाबत त्वरित तपास केला हा मृतदेह संगमनेर येथील एका अल्पवयीन मुलीचा असल्याचे तपासा त समोर आले होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी या प्रकरणात गंभीरपणे लक्ष घालत कसून चौकशी सुरुवात केली. त्यांचे पथक व संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पथक यांनी या खून प्रकरणाचा सूक्ष्म तपास केला. सीसीटीव्ही कॅमेरे चे फुटेज तपासण्यात आले. या अल्पवयीन मुलीचा तुषार विठ्ठल वाळुंज रा. लक्ष्मीनगर. संगमनेर याने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले पोलिसांनी त्याला अटक करून त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने कबुली दिली.

दररोजच्या बातम्या  मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा. संगमनेर अकोले न्यूज

या आरोपीने सदर मुलीस मंगळवार दि. 19 सप्टेंबर रोजी चंदनापुरी घाटात नेले होते. आरोपीने शहरामधून दारू खरेदी केली होती. आरोपीची व या मुलीची जुनी ओळख असल्याने त्याने चंदनापुरी घाटात गेल्यानंतर सदर मुलीस दारू पाजली. दोघेही दारू पिल्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. संतापाच्या भरात आरोपीने तिच्या डोक्यात दगड टाकून तिला ठार केले. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने प्रयत्न केले. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Web Title: The accused who killed a minor girl in Chandnapuri ghat arrested, murder due to this reason

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here