प्रेयसीचा खून करणाऱ्या आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या
Breaking News | Chandarapur Crime: आनंदवनात मागील आठवड्यात झालेल्या युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना.
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध आनंदवनात मागील आठवड्यात झालेल्या युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव समाधान माळी असे आहे. वरोरा येथे 26 जून रोजी आरती दिगंबर चंद्रवंशी (वय 25) या युवतीची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवित आरोपी समाधान माळी याला चोवीस तासात अटक केली.
आरतीच्या हत्येमागे लव्ह ब्रेकअप मर्डर असे वळण असल्याचे पोलीस तपासात समोर आले. आरोपी – समाधानला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आरोपी समाधान माळी हा कुष्ठरोगी असून, तो एक वर्षाआधी आनंदवनात उपचाराला आला होता. तिथेच त्याचा परिचय आरतीशी झाला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दरम्यान, आरोपीने रात्री पोलीस कोठडीत गळफास घेत आत्महत्या केली. यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
Web Title: accused who killed his girlfriend committed suicide in police custody
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study