थाटामाटात लग्न केलं नंतर पती समलैंगिक असल्याचं उघड झालं; महिलेनं थेट
Breaking News | Pune Crime: समलैंगिक (gay) असल्याचं लपवून विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर.
पुणे: पुण्यातून एक फसवेगिरीचा प्रकार समोर आला आहे. समलैंगिक असल्याचं लपवून विवाह केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर व्यक्तीने तरुणीचा छळ केला आहे. हा प्रकार पुण्यातील वडगावशेरी परिसरात घडला आहे.
विवाह करत असताना आपण समलैंगिक असल्याची बाब मुलाने लपवून विवाह केला. त्यानंतर तरुणीचा मानसिक आणि शारीरिक छळ करायला सुरुवात केली. हे प्रकरण हाताबाहेर गेल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठलं. समलैंगिक असलेल्या पतीविरोधात आणि सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सासू-सासरे आणि पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार तरुणी ही पुण्यातील वडगाव शेरी परिसरात राहते. 2022 मध्ये तरुणीचा विवाह झाला होता. विवाहानंतर दोघेही नीट राहत होते. मात्र काही दिवसातच पती समलैंगिक असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर तिने पतीला आणि त्याच्या कुटुंबियांना यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी कुटुंबियांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर मुलीचा छळ करायला सुरुवात केली. त्यानंतर तिला विविध धमक्या देखील दिल्या. सोबतच चारचाकी घेण्यासाठी माहेरुन पैसे आणण्यासाठी तिला त्रास दिला. अनेकदा धमक्या दिल्या मात्र तरीही तरुणीने सगळं सहन केलं. त्यानंतर काही दिवसांनी तिचा त्रास अनावर झाला आणि तिने चंदननगर पोलीस स्टेशन गाठलं. घडलेला सगळा प्रकार पोलिसांना उघडपणे सांगितला. त्यानंतर पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यामध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.
Web Title: After getting married with pomp, it was revealed that the husband was gay
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study