Home संगमनेर संगमनेर: युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, खून करून मृतदेह वाळलेल्या फांद्या टाकून झाकून...

संगमनेर: युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, खून करून मृतदेह वाळलेल्या फांद्या टाकून झाकून ठेवला

Breaking News | Sangamner: बेपत्ता असलेल्या एका युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

after the Dead body of the youth was found

संगमनेर: सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी शिवारात संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथून बेपत्ता असलेल्या एका युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. दिलीप भाऊसाहेब सोनवणे (वय ३६) असे मयताचे नाव आहे. बुधवार दि. ३ एप्रिल रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मयत इसमाचा घातपात करून मृतदेह वाळलेल्या फांद्या टाकून झाकून ठेवलेला होता. मात्र, दुर्गंधी सुटल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याठिकाणी सकाळी गावातील व्यक्ती सदर परिसरात गेली असता त्याला दुर्गंधी येऊ लागली. त्याने पाहणी केली असता नजीकच लिंबाच्या झाडाच्या फांद्यांच्या खाली दाबलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

सिन्नर आणि संगमनेर या तालुक्यांच्या सरहद्दीवरील चिंचोली गुरव येथील दिलीप उर्फ दिपक भाऊसाहेब सोनवणे (36) हा 31 मार्चच्या सकाळी नऊ वाजता गावातच राहणारा मावस भाऊ कृष्णा ऊर्फ पोपट जालींदर जाधव व त्याचा मित्र अजय सुभाष शिरसाट रा. चास, ता सिन्नर यांच्यासोबत पोल्ट्रीवर खत भरायला जातो सांगून घराच्या बाहेर पडला होता.

मात्र संध्याकाळी नेहमीच्या वेळी घरी परत आला नाही. सलग तीन दिवस त्याचा व त्याच्यासोबत असलेल्या दोघांचा थांगपत्ता लागत नसल्याने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी दिलीप बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. त्याच्यासोबत असलेल्या दोघांचे मोबाईल फोन बंद होते. त्यांनी देखील दोन दिवस त्यांच्या घरी संपर्क साधला नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे कुटुंबातील सर्वजण चिंतेत होते.

बुधवारी सकाळी चिंचोली गुरव-वावी रस्त्यावर कहांडळवाडी शिवारात पोल्ट्रीवर काम करणाऱ्या परप्रांतीय तरुणांना एका पडीत शेतातून काटेरी बाबळीच्या वाळलेल्या फासाआडून प्रचंड दुर्गंधी आली. या भागात शेतकरी पोल्ट्री फार्ममध्ये मृत झालेल्या कोंबड्या टाकत असतात.

त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना नेहमीच दुर्गंधीचा सामना करावा लागतो. कामगारांना मात्र ही दुर्गंधी काहीशी वेगळी जाणवली. त्यांनी पुढे जाऊन पाहिले असता मानवी मृतदेह आढळून आला. ही बाब पोलीस पाटील रवींद्र खरात यांच्या माध्यमातून वावी पोलीस ठाण्यात कळविण्यात आली.

तोपर्यंत चिंचोली गुरव येथे देखील अज्ञात पुरुषाचे प्रेत आढळल्याचे समजले होते. शिवेवरच असलेल्या नातेवाईकांनी तेथे धाव घेतली. मृतदेह दिलीपचा असल्याचे सर्वांनी ओळखले. मात्र त्याचा चेहरा दगडांनी ठेचल्यामुळे ओळखण्याच्या पलीकडे गेला होता. घातपात करून तीन दिवस उलटल्यामुळे मृतदेहावर अक्षरशा किडे वळवळत होते.

वावीचे सहाय्यक पोलीस संदेश पवार, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पारस वाघमोडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मात्र हा प्रकार खूनाचा असल्यामुळे सिन्नर ग्रामीण रुग्णालय व तिथून पुढे जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी देण्यात आला.

सदर घटना घातपाताचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले होते. पोलिसांना मृतदेहाच्या जवळच तिघांनी मद्यपान केल्याचे पुरावे मिळून आले. रक्ताने भरलेले दगड, झटपट झाल्याच्या खूना देखील मिळाल्या. मृतदेह उघड्यावर ओळखू येऊ नये म्हणून बाजूला असलेला काटेरी झुडपांचा फास टाकून अर्धवट झाकण्यात आला होता. त्यामुळे तीन दिवस हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांना दुर्गंधीयुक्त वास मेलेल्या कोंबड्यांचा वाटला असावा.

मयत दीपकचे भाऊ देवराम भाऊसाहेब सोनवणे यांच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली. वावी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून दोघा संशयतांचा शोध घेण्यात येत आहे

Web Title: after the Dead body of the youth was found

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here