लग्नानंतर पतीने घेतला चारित्र्यावर संशय, पत्नीने घेतला टोकाचं निर्णय
Breaking News | Pune Crime: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण करत पत्नीला आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक.
पुणे: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण करत पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने मंगळवारी (ता. २) धनकवडी येथील राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली.
शिवानी दीपक दामगुडे (वय २४, रा. सुवर्णयुग शाळेच्या मागे, धनकवडी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी पती दीपक विठ्ठल दामगुडे (वय ३०) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याबाबत शिवानी यांचे वडील काशिनाथ काळू राऊत (वय ५० रा. कोपरखैरणी, नवी मुंबई) यांनी बुधवारी (ता.३) सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचे २०१९ मध्ये दीपक दामगुडे याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपी पतीने शिवानीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला हाताने व कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. तिला वारंवार शिवीगाळ करून सोडून देण्याची धमकी दिली. पतीकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून शिवानी यांनी मंगळवारी पतीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राऊत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Web Title: After the marriage, the husband doubted his character,Suicide her
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study