Home अकोले अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगामाची चिंता मिटली, ६७ कोटी रुपये...

अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगामाची चिंता मिटली, ६७ कोटी रुपये पूर्व हंगामी कर्ज मंजूर

Agasti Sahahakari Sakhar Karkhana Akole: जिल्हा सहकारी बँकेकडून ६७ कोटी रुपये पूर्व हंगामी कर्ज मंजूर.

Agasti Sahahakari Sakhar Karkhana Akole 

अकोले: अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम सुरळीत सुरू होण्यास अडसर राहिला नसून अगस्तीसाठी जिल्हा सहकारी बँकेकडून ६७ कोटी रुपये पूर्व हंगामी कर्ज मंजूर झाल्याचे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सीताराम पाटील गायकर यांनी सांगितले.

शुक्रवारी उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कर्ज प्रस्तावास मंजुरी मिळाली. अकोल्यातील जिल्हा बँकेचे संचालक गायकर, मधुकर नवले, अमित भांगरे उपस्थित होते. अगस्तीचे संचालक अशोक देशमुख, मीनानाथ पांडे हे देखील नगर येथे गेले होते. अगस्तीची निवडणूक स्थगित झाली आहे. निवडणूक प्रक्रियेतील मतदान बाकी आहे. औरंगाबाद खंडपीठात याबाबत याचिका दाखल आहे. ४ ऑगस्ट २०२२ ला सुनावणी आहे. सुनावणी लांबली तर निवडणूक लांबणार असे वाटते. मात्र, अगस्ती गळीत हंगाम सुरू करण्यासाठी विद्यमान काळजीवाहू संचालक मंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत. शुक्रवारी ६७ कोटी प्रीसिझनल लोन मंजूर झाल्याने आता गळीत हंगाम पूर्वतयारीला सुरुवात होईल यात शंका नाही. कर्ज मंजुरीमुळे अगस्तीच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक व कामगारवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. यंदा अगस्तीच्या कार्यक्षेत्रात जवळपास चार लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी आहे. दरवर्षी साधारण दसरा सणाच्या दरम्यान ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होतो, बॉयलर पेटतो. यंदा १ ऑक्टोबरला राज्यात गळीत हंगाम सुरू होणार आहे. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यात प्रीसिझनल कामाची धूम असते. त्यातील महत्त्वाचा भाग ऊस तोडणी कामगार व वाहतूकदार यांचे करार करणे, त्यांना आगाऊ रक्कम देणे, चांगले लेबर मिळविण्यासाठी धडपड करणे अन् गळीत हंगाम सुरु करण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करणे ही कामे असतात. या काळात संचालक मंडळ महत्त्वाची भूमिका बजावते कर्ज मंजूर झाल्याने चिंता मिटली आहे.

Web Title: Agasti Sahahakari Sakhar Karkhana Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here