Home अकोले सावधान अकोलेकर: प्रवरा नदीवरील अगस्ती सेतू पूल पाण्याखाली, भंडारदरा धरण..

सावधान अकोलेकर: प्रवरा नदीवरील अगस्ती सेतू पूल पाण्याखाली, भंडारदरा धरण..

Akole News: निळवंडे धरणातून ४८८० क्यूसेक पाणी प्रवरा नदी पात्रात सोडल्याने अगस्ती पूल पाण्याखाली गेला.

Agasti Setu bridge over river Pravara under water

अकोले: भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून आज सकाळी ६ वाजता धरणाचा पाणीसाठा ९३ टक्के तर सकाळी ९ वाजता ९४.७० इतके झाला होता. त्यानंतरही धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून येथील प्रवरा नदीवरील  अगस्ति सेतू पूल पाण्याखाली गेला आहे.

१५ ऑगस्टपर्यंत भंडारदरा धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी धरण भरल्याचे अधिकृत रित्या घोषित करण्यात येईल. – अभिजित देशमुख, शाखा अभियंता, भंडारदरा धरण

जलाशय परिचलन सूचीनुसार, पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक बघता सद्यस्थितीत धरणाच्या सांडव्याद्वारे १२१८ क्युसेक्स व विद्युत गृहाद्वारे ८२६ क्युसेक्स असा एकुण २०४४ क्युसेक्स विसर्ग प्रवरा नदीपात्रात सुरू होता. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या रहिवाशांनी आपली तसेच आपल्या पशुधनाची व शेती औजारांची काळजी घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

भंडारदरा धरणातून पाण्याची आवक वाढल्यामुळे निळवंडे धरणाचा विसर्गही वाढविण्यात आला आहे. तर आज सकाळी निळवंडे धरणातून ४८८० क्यूसेक पाणी प्रवरा नदी पात्रात सोडल्याने अगस्ती पूल पाण्याखाली गेला असून अकोले नगरपंचायतीच्या वतीने सुरक्षितता म्हणून पुलाच्या अलीकडे रस्त्यावर बेरिगेटस लावण्यात आले आहे.

Web Title: Agasti Setu bridge over river Pravara under water

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here